मुख्यमंत्री महायोजना दूत नोंदणी | Mukhyamantri Mahayojana Doot Registration

Mukhyamantri Mahayojana Doot Registration : महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 50,000 योजनादूत यांची नियुक्ती ही करण्यात येणार आहे. या साठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही १७ सप्टेंबर २०२४ पर्यन्त मुदत ही वाढवण्यात आली आहे . याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

जॉब नाव मुख्यमंत्री महायोजना दूत नोंदणी
राज्य महाराष्ट्र
एकूण जागा ५०,०००
वेतनमान रु. १०,०००० प्रती महिना
अर्ज करण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२४
अर्ज करण्याची लिंक https://mahayojanadoot.org/

योजनादूत माहिती | योजना दूत यांची कामे कोणती | वेतनमान किती दिले जाणार यांची सविस्तर माहिती | त्याच सोबत कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महयोजना दूत माहिती

महाराष्ट्र सरकार ही लोकांसाठी भरपूर योजना ह्या राबवत असते . मात्र सर्व सरकारी योजना ह्या प्रतेक नागरिक पर्यन्त पोहचत नाहीत. त्यामुळे प्रतेक ग्रामपंचायत मध्ये “योजना दूत” हा नेमण्यात येणार आहे. योजना दूत यांना सर्व सरकारी योजनांची माहिती ही सर्व जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम हे करायचे आहे.

योजना दूत यांना सरकार महिन्याला रु . १०,००० एवढे मानधन देणार आहे. तसेच त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. तर इच्छुक उमेदवार यांनी लवकरात लवकर अर्ज हा करायचं आहे.

पात्रता व कागदपत्रे

महा योजना दूत म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता ही पूर्ण करावी लागणार आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्र रहिवासी असावा.
  • पदवी शिक्षण पूर्ण झाले असावे .
  • १८ ते ३५ वर्ष दरम्यान वय असावे.

वरील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहात.

Mahayojana Doot Registration

महायोजना दूत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील माहिती ही उपयोगी ठरणार आहे. सर्वात आधी माहिती नीट वाचा त्या नंतर तुम्ही “महयोजना दूत नोंदणी ” करायची आहे.

सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यायची आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली देण्यात आली आहे. खालील प्रमाणे तुम्हाला वेबसाइट ही दिसणार आहे.

Mukhyamantri Mahayojana Doot Registration
Mukhyamantri Mahayojana Doot Registration

वरील चित्रांमद्धे तुम्हाला दिसत असेल की “नोंदणी” हा ऑप्शन दिला आहे. येथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे. येथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. येथे तुमच्या आधार कार्ड वर OTP पाठवण्यात येईल तो otp टाकायचा आहे. व तुमचं आधार verification पूर्ण करायचे आहे.

Mahayojana Doot Registration
Mahayojana Doot Registration

त्या पुढे तुम्हाला तुमची प्रोफाइल पूर्ण करायची आहे . तुमचा जीमेल व पासवर्ड तयार करायचा आहे . खाली विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे . तुम्हाला तुमचा WhatsApp क्रमांक व शेषणीक माहिती टाकायची आहे.

Mahayojana Doot. org
Mahayojana Doot. org

खाली तुम्हाला Complete Profile येथे क्लिक करून तुमची प्रोफाइल पूर्ण करायची आहे . येथे तुम्हाला आधार कार्ड , डिग्री गुणपत्रक अपलोड करायचे आहे. त्याच बरोबर विचारलेली सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे.

खालील प्रमाणे संपूर्ण प्रोफाइल पूर्ण केल्यावर तुमची प्रोफाइल ही दिसणार आहे. माहिती बरोबर असल्याची खात्री करा.

त्या पुढे तुम्हाला MATCHING JOBS या ऑप्शन वरती क्लिक करून तुमच्या गावामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही ३ गावासाठी अर्ज हा करू शकता. अधिक माहिती पाहिजे असल्यास संपूर्ण माहिती पुन्हा वाचा . येथे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

वरील प्रमाणे तुम्ही महायोजना दूत या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता . अधिक माहिती पाहिजे आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील होवू शकता .